Hinjawadi Citizens'
Own Civic Platform.
हिंजवडीकरांचं आपल्या
हक्काचं नागरी व्यासपीठ.
A citizen-focused platform to report everyday civic issues in Hinjawadi, connect them with the concerned authorities, ensure systematic follow-up, and keep citizens informed about the progress.
हिंजवडीतील दैनंदिन नागरी समस्या सहजपणे नोंदवण्यासाठी, त्या संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी, सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी आणि नागरिकांना कार्यवाहीची माहिती मिळवून देण्यासाठी एक नागरिक-केंद्रित डिजिटल व्यासपीठ.
Your Issue. Our Follow-Up. प्रश्न तुमचा. पाठपुरावा आमचा.Smarter Follow-Up
स्मार्ट पाठपुरावा
Every reported issue is tracked from receipt to resolution through a single coordinated workflow.
प्रत्येक नोंदवलेल्या समस्येचा पाठपुरावा नोंदीपासून निराकरणापर्यंत एकाच व्यवस्थित प्रक्रियेतून केला जातो.
One Hinjawadi, One Platform
एक हिंजवडी, एक व्यासपीठ
Villages, societies, professionals and businesses — everyone reports through the same connected system.
गावठाण, सोसायट्या, व्यावसायिक आणि नागरिक — सर्वांसाठी एकच जोडलेली यंत्रणा.
Built for Every Hinjawadikar
प्रत्येक हिंजवडीकरासाठी
Trusted across wards & societiesवॉर्ड व सोसायट्यांचा विश्वास
Connecting People. Problems. Solutions.नागरिक, समस्या आणि उपाय यांना जोडणारा दुवा.
A Platform for the People of Hinjawadi...
आपल्या हिंजवडीकरांचं... आपल्या हक्काचं व्यासपीठ!
HINJAWADI CITIZEN CONNECT
हिंजवडी सिटीझन कनेक्ट
Hinjawadi has a prominent identity on the global IT map. As our Hinjawadi continues to develop rapidly, citizens living in the village areas, local settlements, housing societies, and the IT Park area still face many everyday civic issues.
जागतिक IT नकाशावर हिंजवडीची ओळख मोठी आहे. वेगाने विकसित होणाऱ्या आपल्या हिंजवडीतील गावठाण, वाड्या-वस्त्या, सोसायट्या आणि IT Park परिसरातील नागरिकांना आजही अनेक दैनंदिन नागरी समस्यांना सामोरे जावे लागते.
Where exactly should we raise our issues? How will they be properly followed up? And how will citizens know what action has been taken on the issue?
आपल्या समस्या नेमक्या कुठे मांडायच्या? त्यांचा योग्य पाठपुरावा कसा होणार? आणि समस्येवर पुढे काय कार्यवाही झाली, हे नागरिकांना कसं समजणार?
To provide a dedicated and effective platform for these everyday issues, and to work towards fulfilling the development-focused "Hinjawadi Model" envisioned by Late Ajit Dada, we are starting a new initiative inspired by his working style — understanding issues, ensuring prompt follow-up, and taking result-oriented action.
याच दैनंदिन प्रश्नांना एक हक्काचं आणि प्रभावी व्यासपीठ मिळावं आणि स्व. अजितदादांनी हिंजवडीसाठी पाहिलेल्या विकासाभिमुख "हिंजवडी मॉडेल"च्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या कार्यशैलीचे स्मरण ठेवत, प्रश्न समजून घेणे, त्यावर तातडीने पाठपुरावा करणे आणि परिणामाभिमुख काम करणे ही भूमिका पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने एक नवा प्रयत्न सुरू करत आहोत.
Under the guidance of Maharashtra Deputy Chief Minister Hon. Sunetra Vahini Ajit Dada Pawar and Members of Parliament Hon. Parth Dada Pawar and Jai Dada Pawar, and based on the concept of young leader Sagar Dattatray Sakhare, we are bringing you —
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि खासदार मा. पार्थदादा पवार व जयदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेतृत्व सागर दत्तात्रय साखरे यांच्या संकल्पनेतून घेऊन येत आहोत —
HINJAWADI CITIZEN CONNECT
हिंजवडी सिटीझन कनेक्ट
Understanding citizens' issues, taking them to the appropriate administrative authorities, and consistently following up for their resolution — this is the main objective of this initiative.
नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्या योग्य प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणे - हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश.
Not Just Reporting. Following Through.फक्त तक्रार नाही... शेवटपर्यंत पाठपुरावा.
Our mission is to create an accessible and transparent connection between the citizens of Hinjawadi and the concerned civic authorities. We aim to make it easier to:
हिंजवडीतील नागरिक आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांच्यात अधिक सुलभ, प्रभावी आणि पारदर्शक समन्वय निर्माण करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांसाठी आम्ही सोपे करू:
- Report everyday civic issuesदैनंदिन नागरी समस्या नोंदवणे
- Share accurate locations & evidenceअचूक लोकेशन व पुरावा शेअर करणे
- Coordinate with authoritiesयंत्रणेशी समन्वय साधणे
- Follow up systematicallyसातत्याने पाठपुरावा करणे
- Track available progressउपलब्ध प्रगती ट्रॅक करणे
- Encourage citizen participationनागरिकांचा सहभाग वाढवणे
One Platform for Everyday Civic Issues.दैनंदिन नागरी समस्यांसाठी एकच व्यासपीठ.
Mosquito Fogging
धूर फवारणी
Report mosquito-prone areas and requests for necessary fogging.
डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि आवश्यक धूर फवारणीबाबत माहिती द्या.
Dangerous Trees
धोकादायक झाडे
Report fallen trees or branches that may pose a risk to people or traffic.
रस्त्यावर आलेली किंवा धोका निर्माण करणारी झाडे व फांद्या नोंदवा.
Potholes & Roads
खड्डे व रस्ते
Report potholes, damaged roads, and road-related obstructions.
रस्त्यांवरील खड्डे, खराब रस्ते आणि अडथळ्यांची माहिती द्या.
Drainage & Waterlogging
ड्रेनेज व पाणी साचणे
Report blocked drains, overflowing sewage, and waterlogging.
तुंबलेले ड्रेनेज, सांडपाणी आणि पाणी साचण्याच्या समस्या नोंदवा.
Garbage & Cleanliness
कचरा व स्वच्छता
Report accumulated garbage and cleanliness issues in public areas.
सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या समस्या नोंदवा.
Streetlights
स्ट्रीट लाईट
Report damaged or non-functional streetlights.
बंद किंवा खराब असलेल्या स्ट्रीट लाईटची माहिती द्या.
Water Supply
पाणीपुरवठा
Report civic water-supply related issues.
सार्वजनिक पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या नोंदवा.
Other Civic Issues
इतर समस्या
Report other relevant local civic problems requiring attention.
आपल्या परिसरातील इतर संबंधित नागरी समस्यांची माहिती द्या.
Simple to Report. Easy to Track.नोंदवणे सोपे. पाठपुरावा पारदर्शक.
Report the Issue
समस्या नोंदवा
Connect with Hinjawadi Citizen Connect through WhatsApp.
WhatsApp च्या माध्यमातून संपर्क साधा.
Share Photo & Location
फोटो आणि लोकेशन पाठवा
Send a photo or short video with the exact location.
फोटो/व्हिडिओ आणि अचूक लोकेशन शेअर करा.
Get Your Complaint ID
तक्रार क्रमांक मिळवा
Your complaint is registered with a unique reference number.
स्वतंत्र Complaint ID दिला जाईल.
Verification
पडताळणी
The information is reviewed and the relevant authority identified.
माहितीची पडताळणी करून संबंधित विभाग निश्चित केला जातो.
Coordination & Follow-Up
समन्वय आणि पाठपुरावा
The issue is forwarded to the appropriate authority and followed up.
समस्या यंत्रणेकडे पाठवून पाठपुरावा केला जातो.
Track Progress
स्थिती जाणून घ्या
Receive available updates about the status of your complaint.
तक्रारीवरील उपलब्ध अपडेट्स मिळवा.
Citizen Confirmation
नागरिकांची खात्री
Once marked resolved, citizens can confirm the issue is actually fixed.
काम झाल्याची खात्री नागरिकांकडून घेतली जाते.
See It. Report It. Track It. फोटो काढा. लोकेशन पाठवा. समस्या नोंदवा.
You Reported It. Now Know What's Happening.तक्रार केली... पण पुढे काय झालं?
Every registered complaint receives a unique Complaint ID. Use it to check the available status of your issue.
प्रत्येक नोंदवलेल्या समस्येला स्वतंत्र Complaint ID दिला जाईल. त्याद्वारे तक्रारीची उपलब्ध स्थिती पाहता येईल.
Because reporting a problem is only the beginning. Follow-up matters. कारण तक्रार नोंदवणे ही सुरुवात आहे; पाठपुरावा महत्त्वाचा आहे.
From Villages to Societies. Every Voice Matters.गावठाण असो की सोसायटी... प्रत्येकाचा प्रश्न महत्त्वाचा.
Hinjawadi is more than an IT hub. It is home to traditional village communities, residential societies, working professionals, businesses, workers, students, senior citizens, and thousands of families.
हिंजवडी म्हणजे केवळ IT Park नाही. गावठाण, वाड्या-वस्त्या, गृहनिर्माण सोसायट्या, IT कर्मचारी, कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो कुटुंबांनी मिळून आजची हिंजवडी घडली आहे.
One Hinjawadi. One Platform. One Connect. एक हिंजवडी. एक व्यासपीठ. एक Connect.
Better Coordination for Better Communities.सोसायटी आणि प्रशासनामधील प्रभावी समन्वय.
Residential societies often face common civic issues that require coordination between residents, society representatives, and government authorities.
हिंजवडीतील गृहनिर्माण सोसायट्यांना अनेक सामूहिक नागरी समस्यांचा सामना करावा लागतो.
Through Society Connect, authorised society representatives can report common civic concerns and coordinate their follow-up in a structured manner.
Society Connect च्या माध्यमातून सोसायटीचे अधिकृत प्रतिनिधी सामूहिक समस्या नोंदवून त्यांचा पाठपुरावा करू शकतील.
Register Your Societyतुमची सोसायटी नोंदवाProgress Should Be Visible.पारदर्शकतेतूनच विश्वास निर्माण होतो.
Hinjawadi Citizen Connect aims to maintain a transparent overview of the civic issues reported through the platform.
Hinjawadi Citizen Connect च्या माध्यमातून नोंदवलेल्या समस्यांचा एकत्रित आढावा नागरिकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
Complaints Received
प्राप्त तक्रारी
Complaints Forwarded
पाठविलेल्या तक्रारी
Under Follow-Up
पाठपुरावा सुरू
Resolved Issues
निराकरण झालेल्या तक्रारी
Area-Wise Issues
परिसरनिहाय समस्या
Category-Wise Issues
विषयनिहाय समस्या
Transparency Builds Trust.कारण पारदर्शकतेतूनच विश्वास निर्माण होतो.
Change Begins With Participation.बदल फक्त अपेक्षेने नाही... सहभागातून घडतो.
If you see a civic issue in your area, don't ignore it. Every responsible citizen can contribute towards making Hinjawadi cleaner, safer, and better organised.
आपल्या परिसरातील समस्या दिसली तर दुर्लक्ष करू नका. स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित हिंजवडीसाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
Sagar Dattatray Sakhare
सागर दत्तात्रय साखरे
Hinjawadi Citizen Connect is an initiative conceptualised by Sagar Dattatray Sakhare, a young social and political leader from Hinjawadi with a long-standing commitment to community development and public service.
हिंजवडी सिटीझन कनेक्ट ही हिंजवडीतील युवा सामाजिक व राजकीय नेतृत्व सागर दत्तात्रय साखरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली नागरिक-केंद्रित संकल्पना आहे.
His journey in social work began at a young age through the Changbhale Group, established in 2005. Through this platform, he has consistently worked across areas such as civic infrastructure, roads, water supply, sanitation, waste management, health, education, sports, youth development, women's empowerment, environmental initiatives and community welfare.
सागर साखरे यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात तरुण वयात चांगभले ग्रुपच्या माध्यमातून झाली. या माध्यमातून त्यांनी नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, युवक विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने कार्य केले आहे.
At the age of 22, Sagar Sakhare was elected Sarpanch of Hinjawadi in 2012 and was re-elected in 2015. During his tenure, he worked on several development initiatives including roads, drainage, water infrastructure, CCTV, sanitation, educational facilities, sports infrastructure and other essential civic services.
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, २०१२ मध्ये ते हिंजवडीचे सरपंच म्हणून निवडून आले आणि २०१५ मध्ये पुन्हा सरपंचपदी निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, CCTV, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, क्रीडा सुविधा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी विविध विकासकामांना चालना देण्यात आली.
He has also served as President of the Nationalist Youth Congress, Mulshi Taluka, strengthening youth participation and grassroots engagement across the region. He continues his social work as the Founder-President of Changbhale Group Trust, Hinjawadi.
त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुळशी तालुका अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत युवकांचे संघटन आणि सामाजिक-राजकीय सहभाग वाढवण्यासाठी काम केले. तसेच चांगभले ग्रुप ट्रस्ट, हिंजवडीचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू आहे.
In his latest electoral journey from the Hinjawadi–Maan Zilla Parishad constituency, he received 17,112 votes, reflecting significant public support and trust.
नुकत्याच झालेल्या हिंजवडी–माण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांनी १७,११२ मते मिळवली, जी त्यांच्या सामाजिक कार्याला आणि नेतृत्वाला मिळालेल्या जनसमर्थनाची पावती आहे.
Building on this journey, Hinjawadi Citizen Connect is his initiative to provide citizens with a structured platform to raise civic issues, connect them with the appropriate administrative authorities and ensure consistent follow-up towards effective resolution.
याच सामाजिक कार्याच्या अनुभवातून हिंजवडी सिटीझन कनेक्टची संकल्पना पुढे आली आहे—नागरिकांच्या दैनंदिन समस्या एका सक्षम व्यासपीठावर नोंदवणे, त्या योग्य प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.